जाणून घेऊयात नॉस्ट्रडेमस विषयी…

पद्माकर पाठकजी

नॉस्ट्रडेमसच्या भविष्याविषयी तुमच्या पैकी खूप जणांनी ऐकले असेल ! भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता सामान्य माणसांना असतेच. लोक नॉस्ट्रडेमस म्हटले की कान टवकारतात. केवळ आपल्याच जीवनात नाही तर राज्यात देशात, जगाय काय घडणार हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी कुतुहलापोटी जे ऐकायला मिळेल, वाचायला मिळेल तिकडे लक्ष दिले जाते.

पण ज्यांचा ज्योतिषावर विश्वास नाही आणि माझ्या जीवनात काय घडेल ते घडेल मला ते जाणून घ्यायचे नाही तसे कोणी सांगू शकत नाही अशा विचारांचे लोक नॉस्ट्रडेमस म्हटले की, नाके मुरडतात ! काही तरी फालतुगिरी आहे असा त्यांचा दृष्टीकोन असतो. नॉस्ट्रडेमस बद्दलचे असे दोन्ही प्रकारचे विचार असणाऱ्यांच्या करिता त्याची ही थोडी माहिती बघा !

नॉस्ट्रडेमसस 1522 या साली मॉंटपेलिअर येथे वैद्यकीयच्या अभ्यासासाठी आला. तेव्हा तो 19 वर्षांचा होता. तीन वर्षात त्याने तो कठिण अभ्यासक्रम पूर्ण केला व त्याहीपेक्षा कठीण अशी त्याची परीक्षा उत्तीर्ण झाला. 1525 साली वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र त्याला मिळाले. त्यापुढे त्या ज्ञानाच्या आधारे सुख उपभोगण्याऐवजी तो प्लेगच्या रुग्णांची विविध ठिकाणी जाऊन सेवा सुषुश्रा करे. त्यांच्यावर औषध उपचार करे आणि निरनिराळ्या औषधांवरचे संशोधनही करत असे. 1559 मध्ये तो डॉक्‍टरकीच्या पुढील अभ्यासासाठी मॉंटेपेलिअर येथे परत आला. त्याने अनेक प्लेगच्या साथीत निर्भयपणे उत्तम काम केले.

एक्‍स येथील प्लेग तर त्याने केवळ आपल्या धैर्याने आणि परोपकार वृत्तीने निरनिराळ्या औषधांचे संशोधन करुन परतवला. त्याकरिता एक्‍सच्या शहर सभेने त्याला आयुष्यभर पेन्शन देण्याचा ठराव संमत केला. त्या शहरात मिळालेल्या देणग्यांची रक्‍कम त्याने गरीबांमध्ये वाटून टाकली. व्यवसाय करताना त्याने पैसे मिळवले. ते कोणीही मिळवतो. पण परोपकारी वृत्ती असल्याशिवाय नॉस्ट्रडेमससारखी किर्ती कोणाला मिळत नाही. नॉस्ट्रेडमसची भविष्यवाणी त्याला कॉलेजच्या शिक्षणाने आली नाही. ही त्याची उपजतच प्रतिभा होती. त्या प्रतिभेचे फळ जास्तीत जास्त नि:शाप ठेवण्याचे काम नॉस्ट्रेडेमसच्या परोपकार वृत्तीने केले. सद्‌गुणांचे सत्कृत्य हे नेहमीच संरक्षक महाकवच असते.

नॉस्ट्रडेमसची ही माहिती जाणून घेतल्यावर त्याच्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलते. नॉस्ट्रडेमस म्हणजे तो जगाचे भविष्य सांगणारा ही एवढीच त्याची ओळख असेल तर ज्योतिषावर विश्वास ठेवणारे त्याला फक्‍त ज्योतिषांचा महर्षी मानतील व ज्योतिष शास्त्र न मानणारे त्याला फेकाफेकी करणारा समजतील ! पण ज्ञान घेऊन त्याच्याकडे पाहणारे त्याच्या सारखी परोपकारी वृत्ती काही अंशी का होईना आपण बाळगावी म्हणून प्रयत्नशील राहतील ! म्हणून एखाद्या घटनेकडे व्यक्‍तीकडे कलेकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता हे महत्वाचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

2 COMMENTS

  1. वरील माहिती वाचल्यावर संशोधक – शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स ह्यांची आठवण होते कारण कोणत्याही प्रयोगशाळेचा उपयोग न करता त्यांनी पृथ्वीचे आयुष्य १०० वर्ष असून मानवाला अस्तित्वासाठी दुसर्या ग्रहाची गरज आहे असे सांगितले होते योगायोगाने ह्या बात माझया वाचण्यात आलेली व आपल्या संतशात्रज्ञांनी कित्तेक वर्ष अगोदरच पृथ्वीचा नाश कसा व केव्हा होणार ह्याचे सविस्तर वर्णन केलेले प्रभात दैनिकाला ह्या अगोदरच प्रतिक्रियांद्वारे कळविले होते आपल्या संतशात्रज्ञानी केलेल्या भाकिताला स्टीफन हॉकिंग्स ह्यांनी सिद्ध केले हे कशाचे द्योतक समजावे ? आपल्याकडील स्वतःला शात्रज्ञ म्हणविणारी मंडळी ह्यांनी लावलेल्या एकातरी संशोधनाने जागतिक मान्यता मिळविली आहे का ? उलट ह्यांनी लावलेले शोध म्हणजे प्रगत देशातील संशोधकांनी लावलेल्या शोधांची एकतर नक्कल असते अथवा त्यांनी टाकून दिलेल्या अथवा त्यांना निरपदर्वी वाटणारे संशोधन आपल्याकडील संशोधकांनी स्वताहाच्या नावावर खपविलेले आढळतात म्हणूनच जागतिक स्थरावर कुचकामी ठरतात नुकताच मुंबईत ह्या मंडळींचा मोर्चाचे निघाल्याचे वृत्त वाचण्यात आले ह्यांनी आजपर्यंतच्या लावलेल्या शोधाची यादी व त्याचा प्रत्यक्ष उपयोग केल्याने देशाचे जटिल प्रश्न कसे सुटलेत व देशाची सर्वांगीण प्रगती कशी होत आहे ह्या साठी जर हा मोर्चाचे निघाला असता तर त्याचे महत्व अधोरेखित झाले असते चीन सारखा भाताचा ओळखला जाणारा देश आपल्या नंतर एक वर्षा नंतर स्वतंत्र होऊनही सर्वच बाबतीत १०० वर्ष आपल्या पुढे आहे (भाग १ )

  2. भाग २ :- आज आपल्या संतशात्रज्ञानी जे ग्रंथ शेकडो वर्ष निर्माण करून ठेवले आहेत त्याचा सखोल अभ्यास करून आजच्या आधुनिक विज्ञाद्वारे उपयोग करण्याचा प्रयत्न केला तर जगाचा आपल्याकडील दृष्टिकोन नक्कीच बदलेल कारण ज्ञानेश्वस्वारांनी मंगल ग्रहावर पाणी नसल्याचे अगोदरच सांगितले आहे व ते खरे ठरले आहे त्याच बरोबर १०० वर्षा नंतर पृथ्वीचे आयुष्य संपणार हे स्टीफन हॉकिंग्स ह्यांनी सिद्ध केले आहे डार्विनचा उत्क्रांतीचा शोध चुकीचा असूनही त्याला जागतिक मान्यता मिळते व आपल्या संतशात्रज्ञानी ८४ लक्ष योनीचे पृथक कारण करून मानवाची निर्मिती झाल्याचे सिद्ध करूनही त्याची टिंगल टवाळी होते स्तफ़ान हॉकिंग्स जर आपल्या देशात जन्मले असते तर त्यांनी आपल्या संतशात्रज्ञानी लावलेला प्रत्येक शोध कसा खरा आहे हे नक्कीच सिद्ध केला असता तेव्हा नास्त्रोद्याम हा भविष्यवेत्या नवहता तर आपल्या संतशात्रज्ञा सारखा च एक संतशात्रज्ञ होता हि त्याची खरी ओळख असावयास हवी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)