जागेच्या उताऱ्यांबाबत जनतेची दिशाभूल : पोळ

श्रीमंतांनाच शासकीय योजनांचा लाभ
कोपरगाव – अतिक्रमणधारकांना हक्काचेउतारे मिळावे असे शासनाचे धोरण आहे. तरीही कोपरगावच्या राजकीय नेत्यांकडून जनतेची दिशाभूल होत आहे, असा आरोप लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन पोळ यांनी केला.
त्यांनी याबाबतचेनिवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनात म्हटलेआहेकी, 1995 पूर्वीची अतिक्रमणे कायम करुन अतिक्रमण धारकांना हक्काचेउतारेद्यावेत, असा आदेश 4 एप्रिल 2002 रोजी शासनाने दिला. अतिक्रमित जागेचेआराखडे तयार करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्याची तरतूद होती. परंतु अशी समिती स्थापन झाली नाही. म्हणून राजेंद्र निंबाळकर यांनी उच्च न्यालयात याचिका दाखल केली. परंतु या आदेशाचे कोपरगाव येथे पालन झाले नाही, असे पोळ यांचेम्हणणेआहे.
लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने वेळोवेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. परंतुअद्याप कार्यवाही झालेली नाही. नगरपालिका व कोपरगावच्या राजकीय नेत्यांनी वाजत -गाजत पंतप्रधान, रमाई व शबरी आवास योजनेचे अर्जएकदा नव्हे तर दोन- तीन वेळा भरुन घेतले. या योजनेकरिता 4 हजार 688 अर्ज आले. स्वतः ची जागा असणाऱ्या 211 लाभधारकांचे अर्ज मंजूर झाले. 125 घरकुल मंजूर झाले. घरकुलाकरिता हक्काच्या जागेची अट असतानाही गोरगरीब जनतेकडून अर्ज भरुन घेण्यात आले. सर्वसामान्यांना कागदपत्र जमा करताना मोठा आर्थिक फटका बसला, असाही दावा पोळ यांनी केला. ज्यांच्या कडे हक्काचे उतारे आहेत अशाच आर्थिक श्रीमंत कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. यामुळे खरेलाभार्थी वंचित राहतील. अतिक्रमण धारकांचा त्वरीत सर्व्हे करुन हक्काचेउतारे मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदनावर सुभाषनगर, संजयनगर, टिळकनगर, इंदिरानगर, हनुमान नगर, लिंबारा मैदान, गजानननगर येथील नागरिकांच्या सह्या आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)