जागा मेट्रोला आणि खर्च पालिकेला

संग्रहित छायाचित्र
  • वीज वाहिन्या हलविण्यासाठी पालिका खर्चणार 62 लाख रुपये

पिंपरी, (प्रतिनिधी) – संत तुकारामनगर प्रभाग क्रमांक वीसमधील व्यापारी संकुलाची जागा महामेट्रोला देण्यात येणार आहे. ही जागा मेट्रोच्या ताब्यात जाणार आहे मग येथील भूमिगत वीज वाहिन्या हलविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका का खर्च करत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. भूमिगत वीज वाहिन्या हलविण्यासाठी महापालिकेने 62 लाख रुपये खर्च करण्याचे ठरवले आहे.

प्रभाग क्रमांक वीसमधील आरक्षण क्रमांक 53 वर व्यापारी संकुल विकसित करण्यासाठी भूमिगत वीज वाहिन्या हलविण्यात येणार असून या कामासाठी सुमारे बासष्ठ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने विद्युत विभागाच्या मागणीनुसार या कामासाठी निविदा मागविली आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या निविदांमधून जगनाडे इलेक्‍ट्रीकल्स यांची निविदा पात्र ठरली असून वीज वाहिन्या हलविण्याचे काम या ठेकेदाराला देण्यात येणार आहे. परंतु आरक्षित जागेवर व्यापारी संकुल होणारच नाही, ती जागा महामेट्रोला देण्यात येणार आहे. असे असेल तर हा 62 लाखांच्या खर्चाचा खटाटोप कशासाठी असा प्रश्‍न सध्या पालिकेत उपस्थित केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)