जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्‍यपद स्पर्धा : भारताची चीन, यूएई, इंग्लंडवर मात 

पुणे- भारताच्या मुलांच्या अ संघाने चीनचा, मुलींच्या ब संघाने इंग्लंडचा आणि मुलींच्या अ संघाने यूएईचा पराभव करून जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्‍यपद स्पर्धेत अनुक्रमे चीन व इंग्लंड संघाचा पराभव करून खळबळ उडवून दिली. मुलींच्या ग्रुप 1 मध्ये पुण्याच्या तनिष्का दोपांडेने फ्रान्स आणि इंग्लंडविरुद्ध एकेरीमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सिलेक्‍टेड टीम मुलांच्या ग्रुप 1 मध्ये भारत अ संघाने चीनवर 4-1 गेमने पराभूत केले. दुहेरीत रितूपर्णा बोरा – पारस माथूर जोडीने जिहडिंग – जिआजून लियू जोडीवर 21-15, 21-12 असा विजय मिळवला. तर तरुण – वरुण त्रिखा जोडीने युफेंग काओ – हाओयिन वांग जोडीवर 21-19, 21-18 अशी मात करून भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर एकेरीत तरुणने डिंगबर 21-12, 21-15 अशी मात करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यानंतर चीनच्या युफेंग काओने वरुणवर 15-21, 21-18, 21-19 अशी मात केली. मात्र, एकेरीतील अखेरच्या लढतीत राजकंवरने वांगवर 21-16, 21-11 अशी मात करून भारत अ संघाला 4-1ने विजय मिळवून दिला. यानंतर सिलेक्‍टेड टीममध्ये मुलींच्या ग्रुप -2 मध्ये भारत अ संघाने यूएईवर 5-0 गेमने ने मात केली. इतर लढतीत सिलेक्‍टेड टीम्समध्ये मुलींच्या ग्रुप 1 मध्ये फ्रान्सने भारत ब संघावर 4-1 ने मात केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)