जागतिक व्यापार संघटनेतून अमेरिका बाहेर पडणार नाही: ट्रम्प

जागतिक व्यापार संघटनेतून अमेरिका बाहेर पडणार नाही

वॉशिंग्टन, अमेरिका जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडणार नाहीं असे स्पष्टीकरण अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. सध्या ट्रम्प यांच्या धडाकेबाज भूमिकेमुळे अमेरिका विविध आंतरराष्ट्रीय करार आणि संघटनांमधून बाहेर पडत आहे. त्यामुळे सध्याच्या व्यापार युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका जागतिक व्यापार संघटनेतूनही बाहेर पडेल अशी शक्‍यता वर्तवण्यात येत होती पण स्वता ट्रम्प यांनी त्याचा इन्कार केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डब्ल्युटीओ म्हणजेच जागतिक व्यापार संघटना म्हणजे एक मोठे अपयश असल्याची टीका ट्रम्प यांनीच केली होती. त्यांनी या संघटनेचे नियम बाजुला सारून अन्य देशांवरील मालावर मोठ्या प्रमाणात आयात कर लागू केले आहेत. चीन आणि अमेरिका तसेच अमेरिका आणि युरोप असे सध्या व्यापार युद्ध सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्यांना आपण जागतिक व्यापार संघटेतून बाहेर पडू असे वारंवार सुचवले आहे. त्यामुळे अमेरिका हा निर्णय लवकरच घेईल असे वातावरण निर्माण झाले आहे पण ट्रम्प यांनी त्याचा इन्कार केला आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, पॅरीस करार अशा महत्वाच्या करारातून अमेरिका नुकतीच बाहेर पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)