जागतिक व्यापारवाढीसाठी सेवांवर भर देण्याची गरज : सुरेश प्रभू

नवी दिल्ली: व्यापार वाढवण्यासाठी सेवांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले आहे. मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रातील घडामोडी जागतिक पातळीवर वाढत असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
अर्जेंटिनातील मार डेल प्लाटा येथे झालेल्या जी-20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत सुरेश प्रभू यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. या बैठकीला जी-20 समूहाचे, आठ अतिथी देशांचे मंत्री आणि डब्ल्यूटीओ, आयटीसी, ओईसीडी, जागतिक बॅंक, आयएमएफ, सीएएफ आणि आयएडीबी यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख/उपप्रमुख उपस्थित होते.
यंदाच्या जी-20 चे अध्यक्षपद अर्जेंटिनाकडे असल्यामुळे अर्जेंटिनाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉर्ज फौरी आणि उत्पादन व श्रम मंत्री डान्टे सिका यांनी संयुक्तपणे या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. समान आणि शाश्वत विकासासाठी सहमती निर्माण करणे हा यंदाचा उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)