नवी दिल्ली – भारताकडून करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या 30 क्षेत्रापैकी 16 क्षेत्राच्या निर्यांतीत व्यापारयुद्धामुळे घट नोंदवण्यात आल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाकडून सादर करण्यात आकडेवारीतून सांगण्यात आली. सप्टेंबरमध्ये निर्यातीत एकूण 2.15 टक्क्यांची घट दर्शवत जात ती 27.95 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार तांदूळ, चहा, कॉपी, तंबाखू, इंजिनिअरिंग, चामडी वस्तू, मसाल्याचे पदार्थ, काजू, सागरी उत्पन्न आणि रत्न आणि जवाहीर वस्तूसह 16 मुख्य क्षेत्रांमधील निर्यांत कमी झाली आहे. तर औषध, प्लॅस्टिक, रसायन आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रामधील निर्यातीत वाढ नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये निर्यांत वृद्धीत नकारात्मकता राहिली होती. व्याजदरावर मिळणारी सवलत तीन टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर करण्यात आल्यास निर्यात वधारण्यास मदत मिळणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा