जागतिक विमा परिषदेसाठी जगताप यांची निवड

सुपा: भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) तर्फे दिला जाणारा, एमडीआरटी (अमेरिका) हा पुरस्कार पारनेर तालुक्‍यातील लोणीहवेली येथील युवराज आबासाहेब जगताप यांना जाहीर झाला आहे. तसेच त्यांना जागतिक विमा परिषदेचे सदस्यत्व मिळाले असून, अमेरिकेत फ्लोरिडा येथे जून 2019 रोजी होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी निवड झाली आहे.

युवराज जगताप हे गेली वीस वर्षांपासून एलआयसीचे प्रतिनिधी असून, त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या यशाबद्दल युवराज जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एलआयसी पारनेर शाखाप्रमुख वाय जी माळी, विकास अधिकारी बाळासाहेब शेलार, संतोष सुडके, दत्तू रोहोकले, लोणी हवेलीचे सरपंच मनिषा कोल्हे, उपसरपंच संजय कोल्हे, माजी सरपंच लहु कोल्हे, सुभाष दुधाडे, डॉ. शंकर कोल्हे, प्रा. संजय कोल्हे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब जाधव, संभाजी थोरे, पारनेर तालुका रोजगार सेवक कार्याध्यक्ष बाजीराव दुधाडे, महानगर बॅंकेचे किसन नवघणे, डॉ. संजय कोल्हे, उद्योजक शिवाजी थोरे, कान्हूरपठारचे शरद कोल्हे, ग्रामसेवक सुनील दुधाडे, दादा कोल्हे, रामदास दुधाडे, विलास दुधाडे, विकास वाळुंज, शेखर सोमवंशी, मंगल रेपाळे आदी यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)