जागतिक वारसास्थळ सी. एस. टी.

सुप्रसाद पुराणिक

राजधानी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही वास्तू “”व्हिक्‍टोरिया टर्मिनस” , “”व्हि.टी.” किंवा “”सी.एस.टी.” या नावानेही ओळखली जाते. मुंबईत येणाऱ्या लोकांची ही वास्तू एक आकर्षण ठरते. परंतु आपल्याकडे अशा वास्तूंची माहिती घेऊन त्या डोळसपणे पहिल्या जात नाहीत. 2 जुलै 2004 रोजी हे स्टेशन युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून नोंदलेले आहे. 19व्या शतकातील ही वास्तू एक ऐतिहासिक रेल्वेस्टेशन असून मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. मध्य रेल्वेच्या भारतभर धावणाऱ्या रेल्वे इथूनच आरंभ करतात. मुंबईतील लोकल्सचेही हे प्रमुख केंद्र आहे.

1878 मध्ये सुरु झालेल्या या इमारतीचे बांधकाम सुमारे 10 वर्ष चालले. 2.85 हेक्‍टर परिसरात असलेली ही इमारत गेली 130 वर्षे मोठ्या दिमाखात उभी आहे. या वास्तूचा आकार इंग्रजीतील C अक्षराप्रमाणे आहे. वास्तूचे बांधकाम गोथिक शैलीत आहे. वास्तुशैलीत गोथिक शैली म्हणजेच युरोपीय व परंपरागत भारतीय स्थापत्यकलेचा संगम बघायला मिळतो. भारतीय स्थापत्यकलेत हिंदू व मुघल या दोन शैलीची सरमिसळ दिसून येते. घुमटाकार छते, टोकदार शिखरे, कमानी, कोरीव नक्षीकाम, वाघ, सिंह, मोर व माणसांच्या चेहऱ्याच्या प्रतिमा आपली नजर खिळवून ठेवतात.

या वास्तूचा अभियंता विल्सन बेल व वास्तुविशारद फेड्रिक विल्यम स्टीव्हन्स हा होता. इंग्लंडची राणी व्हिक्‍टोरिया हिच्यावरून या वास्तूचे नामकरण 1887 मध्ये व्हिक्‍टोरिया टर्मिनस झाले. 1996 नंतर “”छत्रपती शिवाजी टर्मिनस” असे ओळखले जाऊ लागले. काही दिवसांपूर्वीच या वास्तूचे नाव “”छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” असे केलेले आहे. भर मुंबईतला हा परिसर नेहमीच टॅक्‍सी, बसेस, गर्दीने गजबजलेला असतो. तेव्हा युनेस्कोने जागतिक वारसास्थळ घोषित केलेली ही इंग्रजकालीन वास्तू आवर्जून पाहावी अशीच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)