जागतिक योग दिनानिमित्त सिंबायोसिसमध्ये योगसाधना उपक्रम

पुणे-आरोग्यसंवर्धनासाठी विशेष भर देणार्या सिंबोयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये जागतिक योग दिनानिमित्त विविध  उपक्रमांचे आय़ोजन 21 जून तसेच वर्षभरात करण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर आवाहन करून सुरु केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अधिक प्रभावीपणे योगाचे महत्व अधोरेखित व्हावे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहीती सिंबायोसिस विद्यापीठाच्या आरोग्य आणि जैववैद्यकीय विज्ञान विभागाचे डीन डॉ.राजीव येरवडेकर यांनी दिली.
सिंबायोसिस विद्यापीठाच्या पुणे,नाशिक ,बेंगळूरू,नॉयडा,हैद्राबाद या कॅम्पसमध्ये योगाचे सर्वोत्तम फायदेविषयक महत्व अधोरेखीत करणारे सेशन्स आयोजित करण्यात आले आहेत.योगातील प्राणायाम,योगसाधना या पैलूंचा विचार करुन जवळपास 25 ते 30 देशांतील आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शिक्षण घेणारे 150 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत आहेत.पुण्यात बुधवारी सकाळी 11 ते 11.45 या वेळेत सिंबायोसिस सोसायटीच्या डॉ.आंबेडकर स्मृती संग्रहालय सेनापती बापट रोड या प्रांगणात विशेष योगा सेशन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)