जागतिक योग दिनानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे, दि. 19 (प्रतिनिधी)- जागतिक योग दिनानिमित्ताने सिंबोयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे दि. 21 जून रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या पुणे, नाशिक, बेंगळूरू, नाएडा, हैद्राबाद या कॅम्पसमध्ये योगाचे सर्वोत्तम फायदेविषयक महत्व अधोरेखीत करणारे कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहेत.

योगातील प्राणायाम, योगसाधना या पैलूंचा विचार करुन जवळपास 25 ते 30 देशांतील आंतराष्ट्रीय पातळीवरचे शिक्षण घेणारे 150 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत आहेत. पुण्यात बुधवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत सिंबायोसिस सोसायटीच्या डॉ. आंबेडकर स्मृती संग्रहालयच्या प्रांगणात विशेष योग कार्यशाळा होणार आहे. अशी माहिती सिंबायोसिस विद्यापीठाच्या आरोग्य आणि जैववैद्यकीय विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)