जागतिक पातळीवर भारतीय कंपन्यांचा विस्तार वाढला 

नवी दिल्ली: जागतिक पातळीवर सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या फोर्ब्सच्या यादीत 12 भारतीय कंपन्यांनी स्थान पटकावले आहे. यात इन्फोसिस, टीसीएस आणि टाटा मोटर्स या कंपन्यांनी पहिल्या 50 मध्ये जागा मिळवल्याची माहिती फोर्ब्सकडून सादर करण्यात आलेल्या यादीतून स्पष्ट करण्यात आले.
मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वॉल्ट डिज्नी कंपनीने यादीत प्रथम क्रमाकांचे स्थान पटकावले आहे. अमेरिकन कंपनी वॉल्ट डिज्नीचा मार्केट कॅप 165 अब्ज डॉलर्स इतका असून हॉटेल क्षेत्रात कार्यरत असणारी हिल्टन ही कंपनी यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर इटलीची कार उद्योगात अग्रेसर असणाऱ्या फेरारीने तिसऱ्या स्थानी यश मिळवले आहे.
फोर्ब्सकडून सादर करण्यात आलेल्या फोर्ब्सच्या यादीत अमेरिकन कंपन्यांचा दबदबा असून त्यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत 61 अमेरिकन कंपन्या असल्याची नोंद करण्यात आली आहे.
जपानच्या 32 कंपन्या या यादीत असून चिनी 19 कंपन्यांसोबत फ्रान्सच्या 13 कंपन्यांचाही समावेश आहे. यानंतर भारताची वर्णी लागत असून 12 कंपन्यांची नावे यात आहेत. जर्मनीने 11 कंपन्यांसह यादीत प्रवेश केला असल्याचे यावेळी स्पष्टीकरण करण्यात आले. गेल्या काही वर्षापासून भारतातील कंपन्यांचा जागतिक पातळीवर विस्तार होत आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)