जागतिक नेमबाजी स्पर्धा: अभिषेक वर्माची ऑलिम्पिक पात्रता हुकली

चांगवेन: आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या अभिषेक वर्माने वरिष्ठ गटातील 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारातील अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सौरभने पात्रता फेरीत 583 गुणांची नोंद करीत आपल्याबद्दलच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र अंतिम फेरीत आठव्या क्रमांकावर फेकला गेल्यामुळे त्याचे पदक हुकले. इतकेच नव्हे तर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची त्याची संधीही हुकली.

त्याच वेळी अभिषेक वर्मा, ओम प्रकाश मिथरवाल आणि शाहझार रिझवी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारातील सांघिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करीत वैयक्‍तिक स्पर्धेतील अपयशाची काही प्रमाणात भरपाई केली. ज्युनियर गटातील मुलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारांत अमन अली इलाही, विवान कपूर आणि मानवादित्य सिंग राठोड यांच्या भारतीय संघाने रौप्यपदक पटकावले. या संघाने 348 गुणांची नोंद करताना सुवर्णविजेत्या ऑस्ट्रेलियानंतर दुसरे स्थान मिळविले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)