जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रोटरी क्‍लबतर्फे मोफत तपासणी शिबीर

पिंपरी: रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे पिंपरी-चिंचवड महापालिका क्षयरोग विभागाच्या सहकार्याने मोफत क्षयरोग तपासणी करण्यात आली.

पिंपरी, (प्रतिनिधी) – जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे पिंपरी-चिंचवड महापालिका क्षयरोग विभागाच्या सहकार्याने पिंपरी, फुलेनगरमधील नागरिकांची मोफत क्षयरोग तपासणी करण्यात आली. तसेच क्षयरोगाबाबतची जनजागृती देखील करण्यात आली. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून 100 जणांची मोफत तपासणी करण्यात आली. क्षयरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर दैठणकर यांनी नागरिकांची तपासणी केली.

पिंपरी, फुलेनगर येथे बुधवारी हे मोफत क्षयरोग तपासणी शिबिर पार पडले. रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षा वर्षा पांगारे, महापालिकेच्या ज्येष्ठ महिला वैद्यकीय अधिकारी तृप्ती सागळे, रोटरीच्या सचिव नीता अरोरा, प्रकल्प अधिकारी राम भोसले, डॉ. डी. वाय.पाटीलचे क्षयरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर दैठणकर, वायसीएमचे सचिन मरगळ, हनुमंत बिडवे, परिचारिका मानसी पुणतांबेकर, वैशाली शास्त्रकार, दीपाली नवले आदी उपस्थित होते.

रोटरी क्‍लबच्या अध्यक्षा वर्षा पांगारे म्हणाल्या, क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.

प्रकल्प अधिकारी राम भोसले म्हणाले, ”देशात 25 टक्के नागरिक क्षयरोगाने पिडीत आहेत. क्षयरोगाबाबत जनजागृती करण्याची आवश्‍यकता आहे. दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. क्षयरोग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्‍लबतर्फे फुलेनगरमधील नागरिकांची मोफत क्षयरोग तपासणी करण्यात आली. क्षयरोगाचे निदान झालेल्या नागरिकांवर महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)