वॉशिंग्टन – जागतिकीकरणाची वेगाने प्रक्रिया सुरू असलेल्या जगामध्ये राष्ट्र आणि संस्कृती या संकल्पनांना अधिकाधिक महत्व आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवके संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी केले आहे. वॉशिंग्टन येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की भारताने वेदांताच्या काळापासून जागतिकीकरणात योगदान दिले आहे.

जागतिकीकरणात संस्कृती आणि राष्ट्रांचे महत्व हा त्यांच्या या व्याख्यानाचा विषय होता. सहिष्णुता, सन्मान आणि स्वीकार्यता या मुल्यांना महत्व देत मानवी संस्कृती बळकट होणार असेल तर आर्थिक जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे कोणताहीं धोका निर्माण होणार नाही पण तसे जर होणार नसेल तर जागतिकीकरणाने मानवाने आजवर जे कमावले आहे त्यावर पाणी पडण्याचा धोका आहे. ते म्हणाले की जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरूवातीला जेव्हा रूजवण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी आर्थिक आणि दळवळण तंत्रज्ञान क्षेत्रात या संकल्पनेचा वापर केला गेला.

जागतिकीकरणामुळे संस्कृती आणि राष्ट्र या संकल्पनांचा ऱ्हास होत जाईल अशी भीती बाळगली गेली पण नेमके उलट सध्या घडताना दिसून येत असून जागतिकीकरणाच्या वातावरणात संस्कृती आणि राष्ट्र या संकल्पनांनाच अधिक महत्व येत आहे. जागतिकीकरणाच्या प्रकियेतून कृत्रिम एकजिनसीपणा आणण्याचा प्रयत्न होत आहे तो घातक आहे असेही त्यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)