जांभूळ-सांगवीच्या सरपंचपदी अश्‍विनी ओव्हाळ

वडगाव मावळ – जांभूळ-सांगवी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्‍विनी अमोल ओव्हाळ यांची एकमताने निवड झाली. सरपंच लीलाबाई जांभूळकर यांनी राजीनामा दिल्याने त्या रिक्‍त पदाची निवडणूक बुधवार दि.18 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर म्हांकाळे, तलाठी वैभव भुतेकर व ग्रामसेवक रामचंद्र कारंडे यांच्या उपस्थितीत झाली. सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी नऊ सदस्यांपैकी अश्‍विनी अमोल ओव्हाळ व मनीषा गणेश लालगुडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यांची नामनिर्देशन पत्रे वैद्य ठरल्याने एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात असल्याने गुप्त मतदान घेण्यात आले. अश्‍विनी ओव्हाळ हिला 5 मते, तर मनीषा लालगुडे यांना 4 मते पडली. अश्‍विनी ओव्हाळ एक मताने विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर म्हांकाळे यांनी घोषीत केले.

12 एप्रिलला निवडणूक जाहीर करण्यात आली होती. 8 सदस्यांना निवडणूक सूचना मिळाली, तर मनीषा लालगुडे यांना 14 एप्रिल रोजी तहसीलदार, मंडलाधिकारी यांची सूचना मिळाल्याने मंगळवार दि. 18 रोजी निवडणूक घेण्यात आली.
यावेळी लीलाबाई जांभुळकर, उपसरपंच पै. अकुश काकरे, चंद्रकांत ओव्हाळ, दत्तात्रय जांभुळकर, श्‍याम पवार, रखाबाई भोईर, नंदाबाई गराडे, अश्विनी ओव्हाळ, मनीषा लालगुडे आदी उपस्थित होते.

-Ads-

अश्‍विनी ओव्हाळ यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अश्‍विनी ओव्हाळ म्हणाल्या, जांभूळ-सांगवी ग्रामपंचायत हद्दीत रस्ते, नाले, पथदिवे, पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर राहू. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सार्वजनिक व वैयक्‍तीक योजना राबवण्यासाठी पुढाकार घेऊ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)