जांभुळ विक्रेत्यांना बाजार समिती देणार पर्यायी जागा

नवीन नियमावलीमुळे नेहमीच्या जागेवर विक्री करणे अशक्‍य 


जांभळाचा हंगाम सुरू


दहा दिवसांनी होईल नियमित आवक सुरू

पुणे – फळे विभागातील नवीन नियमावलीमुळे नेहमीची जांभुळ विक्रीची जागा गमावलेल्या आडत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मार्केट यार्डातील प्रवेश क्रमांक चारकडून डाळिंबयार्डाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेली जागा उपलब्ध करून देण्याची तयारी बाजार समितीने दर्शविली आहे.
संबंधित आडत्यांना ही जागा पसंत आहे. सोमवारपासून ही जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, याबाबत त्वरित निर्णय होण्याची शक्‍यता आहे.
मार्केट सुरू झाल्यापासून प्रवेश क्रमांक 1 पासून गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर जांभळाची विक्री व्हायची. मात्र, वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी बाजार समितीने फळे विभागात नवीन नियमावली तयार केली आहे. या नियमावलीमुळे ही जागा विक्रीसाठी जांभुळ विक्रेत्यांना मिळणे शक्‍य नाही. आता जांभुळाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे जांभळाची विक्री कोठे करायची हा प्रश्‍न निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीने जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. याविषयी जांभळाच्या हंगामाविषयी व्यापारी अजय घुले म्हणाले, नेहमीच्या तुलनेत 10 दिवस उशिराने जांभळाची आवक सुरू झाली आहे. सावंतवाडी, कणकवली, कुडाळ भागातून आवक सुरू झाली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत जांभळाचा हंगाम सुरू असतो. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गावरान आणि बडोदा येथूनही जांभळाची आवक सुरू होते. हंगाम सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे 300 ते 400 डाग आवक होत असते. आता तुरळक आवक सुरू झाली आहे. बाजारात दाखल झालेल्या जांभळास गुरूवारी घाऊक बाजारात प्रती किलो 160 ते 180 रुपये भाव मिळाला. आणखी दहा दिवसांनी आवक नियमत सुरू होईल. जांभुळ हे “मधुमेह’वर गुणकारी आहे. त्यामुळे जांभळांना खूप मागणी आहे. किरकोळ विक्रेते, औषधाच्या कंपनी, ज्युस, पल्प विक्रेते यांच्याकडून जांभळांना मोठी मागणी असते.

नवीन नियमावलीमुळे पूर्वीच्या जागेवर जांभळांची विक्री करणे शक्‍य नाही. त्यामुळे जांभुळ विक्रेत्यांशी नवीन जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली आहे. मार्केट यार्ड प्रवेशक्रमांक चार पासून डाळींबयार्डाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेली जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला आहे. आडत्यांनीही त्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
-बी.जे.देशमुख, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)