जांभुळणीचे ग्रामस्थ टॅंकरसाठी आक्रमक

म्हसवड – माण तालुक्‍यात दुष्काळाचे गंभीर परिणाम दिसु लागले असून गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी वाढु लागली असुन जांभुळणी गावालाही सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवु लागली असल्याने याठिकाणी पाण्याचा टॅंकर सुरु करावा अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाकडे करण्यात आली आहे.

याबाबत जांभुळणी ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2011च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या 3 हजार 143 आहे. या गावासाठी गावठाण बेघरवस्ती व मिनी वॉटर सल्पाय या दोन्ही योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या दुष्काळाचे तीव्र चटके तालुक्‍याला बसू लागल्याने भुगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. त्याचा परिणाम प्रत्येक गावच्या पाणी पुरवठा योजनेवर झाला आहे. जांभुळणी गावालाही याचा फटका बसला असून गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड कि.मी. रोज पायपिट करावी लागत आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)