जांभळाची आवक वाढली : भावात किलोमागे 20 ते 30 रुपयांनी घसरण

 
कोकण आणि कर्नाटकातून होतेय आवक


नागरिकांकडून मोठी मागणी

पुणे – मधुमेहसाठी गुणकारी असलेल्या जांभळाची आवक वाढली आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात कोकण आणि कर्नातकातून टपोऱ्या जांभुळ आणि करवंदाची आवक होत आहे. परिणामी, मागील दहा दिवसांच्या तुलनेत जांभळाच्या भावात घाऊक बाजारात किलोमागे सुमारे 20 ते 30 रुपयांनी घट झाली आहे. आवक आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. घरगुती ग्राहकांसह, शहर, जिल्ह्यातील किरकोळ विक्रेते, ज्युस विक्रेत्यांकडून जांभळाला
मागणी आहे.
मागील महिन्यापासून जांभळाचा हंगाम सुरू झाला आहे. विशेषत: जांभुळ हे मधुमेहसाठी गुणकारी आहे. कोकणातील सावंतवाडी, कणकवली आणि कर्नाटकातील कटनाळ परिसरातून जांभळांची ही आवक होत आहे. रविवारी कोकणातून सुमारे 150 ते 200 पाट्या आणि कर्नाटकातून 90 ते 100 डाग विक्रीस दाखल झालेल्या आहेत. आवक वाढल्यामुळे जांभळांचे भाव दहा किलोच्या पाटीमागे 200 ते 300 रुपयांनी कमी झाल्याची माहिती आडते अजित घुले यांनी दिली. ते म्हणाले की, पुढील आठवड्यापासून जांभळांची आवक आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सध्याचे भाव आणखी कमी होण्यास मदत होईल. देठ आणि आकाराने लहान असलेल्या सावंतवाडी भागातील जांभळांचा प्रतिदहाकिलोचा भाव 700 ते 800 रुपये आणि कर्नाटक भागातील मोठ्या जांभळांचा भाव 800 ते 1 हजार रुपयांवर आलेला आहे. पूर्वीच्या तुलनेत जांभळांची गोडी आता वाढलेली आहे. त्यामुळे मागणीही वाढते आहे. दरम्यान करवंदाचीही आवक वाढली आहे. जिल्ह्यातून विशेषत: मावळ, मुळशी, वेल्हा तालुक्‍यातून करवंदाची आवक होत आहे. रविवारी हंगामातील उच्चांकी म्हणजे सुमारे सव्वाशे पाट्यांइतकी आवक झाली. त्यामुळे 10 किलोचा भाव घटून 200 ते 300 रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. हंगामाच्या सुरवातीला हा भाव 500 ते 600 रुपयांवर गेला होता.

 

एक किलोच्या पॅकिंगमध्ये गुजराती जांभुळ
गुजरात येथील बडोदा भागातून पारस जातीच्या जांभळाची आवक रविवारी मार्केट यार्डात झाली. शेतकरी अमरिश गांधी यांच्या शेतातून 280 किलो जांभळाची आवक झाली आहे. हा जांभुळ चवीला गोड, स्थानिक जांभळांपेक्षाही तजेलदार आहे. त्याच्या प्रतिकिलोस दर्जानुसार 180 ते 200 रुपये भाव मिळाला. एक किलोच्या आकर्षक पॅकींगमध्ये मार्केटयार्डात प्रथमच जांभळाची आवक झाली. शहरातील उच्चभ्रु अशा कॅम्प, औंध, लष्कर, डेक्कन, कोरेगाव पार्क आदी भागातून या जांभळाला मागई आहे. पुढील एक महिना या जांभळाची आवक सुरू राहिल, अशी माहिती व्यापारी माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर आंनी दिली. दरम्यान, किरकोळ बाजारात 250 ते 300 रुपये प्रतिकिलो भावाने या जांभळाची विक्री होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)