जांब येथील दारुदुकानावर धाड

भुईंज, दि. 3 (प्रतिनिधी) –
जांब, ता. वाई येथील संतोष बारवर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी धाड टाकुन राहूल शिंदे, संतोष शिंदे या दोन भावांना दारु विकताना रंगे हात पकडुन त्यांच्या कडुन 30 हजार रुपये किमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या. पण यावेळी संतोष पळून जाण्यास यशस्वी झाला. तर राहुलला अटक करुन दोन्ही भावांवर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास आला आहे. पडलेल्या याधाडीमुळे वाई तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशीही त्यांचेवर भुईंज पोलिसांनी धाड टाकून गुन्हे दाखल केले होते. दारू बंदी विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर आर्थिक तडजोडी करुन वरील ठिकाणी नेहमीच ड्रायडे दिवशी दारु विक्री केली जाते. अजीत टिके उपनिरक्षक एस. पी. बर्गे, हवलदार दीपक जाधव, संपत शिंदे, नंदकुमार महाडीक यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)