जांबे येथील घटनेचा नोंदविला निषेध

हिंजवडी- जांबे (ता. मुळशी) येथे बुधवारी (दि. 13) जबरदस्तीने मानवी विष्ठा खायला लावल्याप्रकरणी मुख्य आरोपीस त्याच दिवशी अटक केल्यानंतर बुधवारी (दि. 20) दोघांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी अटके केलेल्या आरोपींना सोमवार (दि. 25) पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेचा दलित पॅंथरच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्‍त करण्यात आला असून आरोपींवर कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन हिंजवडी पोलिसांना देण्यात आले आहे. संदिप पवार, दिपाली पवार, ऋषिकेश जाधव असे आरोपींचे नावे आहेत. तर सुनिल अनिल पवळे (वय 21) यांने फिर्याद दिली आहे. दरम्यान, दलित पॅंथरचे जिल्हाध्यक्ष विशाल खिलारे, बावधन ग्रामपंचायत सदस्य रेश्‍मा विशाल खिलारे, सचिन खिलारे, ज्योती वैरागर, संदिप जाधव, माया कांबळे, अक्षय खंडागळे, संतोष खिलारे, गणेश कांबळे, अल्पना गोठे यांनी हिंजवडी पोलिसांना कारवाईचे निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)