जांबे ग्रामपंचायतीकडून वार्षिक निधीचे वाटप

वाकड (वार्ताहर) – विविध करांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या तिजोरीत जमा होणाऱ्या उत्पन्नापैकी काही निधीचे जांबे गावातील गरजू तसेच ग्रामस्थांच्या हितासाठी वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, कलम 124 अंतर्गत मिळकत कर आकारणी केली जाते. हिंजवडी आयटी नगरीला लागूनच असलेल्या गावांचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे कराच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना होणारे उत्पन्न देखील वाढत आहे. नियमानुसार मिळतकराच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीच्या साधारणत: 30% रक्कम ही गावातील गरजू ग्रामस्थ तसेच सर्वांगीण विकासासाठी खर्च करणे बंधनकारक असते.

याचाच भाग म्हणून जांबे ग्रामपंचायतीकडून सन 2017-18 साठी एकूण निधीच्या 3% निधी अपंग बांधवांसाठी, 10% निधी गावातील महिलांना केटरिंग, बेकिंग, टेलरिंग अशा विविध प्रशिक्षणासाठी तर 15% निधी दलित बांधवांसाठी, समाज मंदिर व सामूहिक कार्यक्रमासाठी केटरिंगचे साहित्य अशा स्वरूपात तीन लाखाहून अधिक रकमेचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात सरपंच अंकुश गायकवाड, उपसरपंच शिलाताई अनिल मगर, सदस्य प्रकाश निकाळजे, योगिता मांदळे, रूपाली गायकवाड, रंजना गायकवाड, सुजाता गायकवाड, ग्रामसेवक रोहिणी खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य गणेश गायकवाड यांनी केले तर रेश्‍मा जगताप यांनी अभार मानले. यावेळी आजी माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)