जांबूत येथे बीटस्तरीय मैदानी स्पर्धा उत्साहात

टाकळी हाजी-जिल्हा परिषद व पंचायत समिती शिरूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत कवठे बीट पातळीच्या स्पर्धा जांबूत येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात पार पडल्या.
स्पर्धेचे उद्‌घाटन जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच डॉ. जयश्री जगताप, उपसरपंच गणेश सरोदे, शरद बोंबे, अरुण कदम, केंद्रप्रमुख महादेव बाजारे, दत्तात्रय शिंदे, सुनील जोशी, रामदास बोरुडे, बाळासाहेब फिरोदिया, बाळासाहेब पठारे, मुख्याध्यापक पी. सी. बारहाते, रंजना खोमणे, बाळू घोडे, आशा पोकळे, संपत पोखरकर, अरुण गांजे, नवनाथ निचित, खंडू निचित, शोभना गावडे, म्हातारबा बारहाते, संतोष रणसिंग, शिवाजी दरेकर, राजेंद्र जोरी, विलास गावडे, सुभाष कोरडे, दत्तात्रय चिकटे, प्रभाकर शेळके, बाबाजी हिलाळ, साधना खोमणे, चेअरमन बाळासाहेब आसवले, शिक्षक नेते शिवाजी वाळके उपस्थित होते. सूत्रसंचालन लहू गाजरे यांनी केले तर मुख्याध्यापक सुरेश शिंदे यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – सांघिक प्रथम क्रमांक कबड्डीमध्ये मुले- कवठे येमाई, मुली -अण्णापूर. खो खो मुले पिंपरखेड, मुली उचाळेवस्ती. लेझीम मोठा गट- काठापूर खुर्द, माळवाडी टाकळी हाजी; लहान गट मुले जांबुत, मुली- चांडोह. लोकनृत्य लहान गट – शिवनगर, मोठा गट -उचाळेवस्ती. वैयक्तिक स्पर्धा प्रथम क्रमांक मुले शंभर मीटर धावणे – असिम अन्सारी (कवठे येमाई) मुली साक्षी कुरूंदळे (अण्णापूर). 50 मीटर धावणे मुले -मयूर वाघ (पिंपरखेड), मुली ऋतुजा रासकर (निमगाव भोगी). लांब उडी मोठा गट मुले – असिम अन्सारी (कवठे येमाई), मुली- पल्लवी सूर्यवंशी (अण्णापूर). लहान गट मुले- मयूर शिंदे (मलठण), मुली -पवित्रा गाढवे (उचाळेवस्ती). उंच उडी मोठा गट मुले -असिम अन्सारी (कवठे येमाई), मुली- शुभांगी शिंदे (निमगाव भोगी), लहान गट मुले – तुषार सरोदे (गणेश नगर), मुली – पवित्रा गाढवे (उचाळेवस्ती). गोळा फेक मुले – असीम अन्सारी (कवठे येमाई), मुली- तनुजा रोडे (कवठे येमाई). चेंडूफेक मुले -मोहम्मद अन्सारी (कवठे येमाई). मुली – पवित्रा गाढवे (उचाळेवस्ती), वकृत्व स्पर्धा मुले – आदिती घोडे (गणेशनगर- कवठे येमाई), मुली- सई वराळ (टाकळी हाजी). भजन स्पर्धा लहान गट – मलठण, मोठा गट -पिंपरखेड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)