जांबवडे गावच्या सरपंचपदी सारिका घोजगे

इंदोरी – मावळ तालुक्‍यात निवडणूक प्रक्रिया सुरु असलेल्या सात ग्रामपंचायतीपैकी सुदुंबरे व जांबवडे या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तालुक्‍यातील सुदुंबरे, जांबवडे, कल्हाट, ओव्हळे, दिवड, सुदवडी, कोंडीवडे (अ.मा) या 7 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरु आहेत.

सुदुंबरेच्या सरपंच पदासह 11 जागा तर जांबवडेच्या सरपंचपदासह 6 जागा पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. जांबवडे गावच्या सरपंच पदी सारिका अनिल घोजगे यांची सहमताने बिनविरोध निवड करण्यात आली, तसेच सदस्य पदी, प्रभाग क्रमांक 1 विशाल घोजगे, प्रभाग क्रमांक 2 उज्वला नाटक, प्रशांत भोसले, प्रभाग क्रमांक 3 अंकुश घोजगे, वैशाली भांगरे, स्वाती शिंदे, या सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या आहे.

या बिनविरोध निवडणुकीमुळे जांबवडे गावामधील एकीचे उदाहरण समाजापुढे उभे राहिले आहे. गावची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दत्तात्रय नाटक, संदीप घोजगे, शिवाजी नाटक, सुदाम घोजगे, काशीनाथ भांगरे, सचिन नाटक, पांडुरंग घोजगे, रामदास नाटक, बाळू भांगरे, रमेश जाधव आदींनी प्रयत्न केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)