जहॉंगीर रुग्णालयाजवळ भरधाव सिमेंट मिक्‍सर उलटला

जहॉंगीर रुग्णालयाजवळ भरधाव सिमेंट मिक्‍सर उलटला
तब्बल पाच तासाने मिक्‍सर हलवण्यात यश ; वाहतूक वळवली
पुणे,दि.1- जहॉंगीर रुग्णालयाजवळ शनिवारी सकाळी भरधाव सिमेंट मिक्‍सर ट्रक रस्ता दुभाजकाला धडकून उलटला. रस्ता मोकळा असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र हा सिमेंट मिक्‍सर तब्बल 220 टनांचा असल्याने त्याला रस्त्यातून बाजूला घेण्यासाठी तब्बल पाच ते सहा तास लागले. तो पर्यत येथील वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली होती.
मंगलदास रस्त्यावरुन जहॉंगीर रुग्णालयाकडे सकाळी रस्ता मोकळा असल्याने सिमेंट मिक्‍सर ट्रक भरधाव वेगाने चालला होता. रुग्णालयाजवळ येताच चालकाचा ताबा सुटल्याने तो रस्ता दुभाजकाला धडकून पलटला. यामुळे रस्ता जवळपास बंद झाला होता. याची माहिती वाहतूक शाखेस मिळताच तातडीने घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. तोपर्यंत टॅंकर चालक अन्सारी याने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पोलिसांनी प्रथम येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. यानंतर दोन ते तीन क्रेन मागवण्यात आल्या. टॅंकर जड असल्याने शेवटी मेट्रोचीही क्रेन मागवण्यात आली. या सर्व क्रेनच्या सहाय्याने तब्बल पाच ते सहा तासानंतर सिमेंट मिक्‍सर ट्रक रस्त्यातून बाजूला घेण्यात यश आले. वाहतूक शाखेच्या सुचेता खोकले आणी सहा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी वाहतूक नियंत्रण केले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात टॅंकर चालकाविरुद्द मोटर व्हेईकल ऍक्‍टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)