“जस्ट चिल, टायगर अभी जिंदा है’

सलमान खान आणि केटरिना कैफ यांची ऑन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री खूपच जबरदस्त आहे. या दोघांमधील अफेअर आणि ब्रेकअपचा विषय प्रेक्षकांमध्ये खूपच रंगला होता. आता पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री सुरू असल्याचे दिसून येते. यावेळी सलमान खान खूपच गंभीर आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या आयफा अवॉर्डस सोहळ्यानंतर त्याने केटरिनाला डेडिकेट केले. जिचा रविवारी जन्मदिवस होता.

आयफा अवॉर्डस सोहळ्याच्या प्रसंगी स्टेजवर परफॉर्म करताना सलमान खान एक सेकंद थांबला आणि कॅटरिनाकडे इशारा करत म्हणाला, ओ सोनेयो, जस्ट चिल, टायगर अभी जिंदा है. त्यानंतर त्याने “मैंने प्यार क्‍यों किया’ चित्रपटातील “जस्ट चिल चिल’वर परफॉर्म सादर केला. हा परफॉर्म सोहळ्यास उपस्थितांना खूपच आवडला. मात्र, यावर केटरीनाची काय रियाक्‍शन असेल याकडे सर्वांनाचे लक्ष्य लागले आहे. केटरीनाला स्पेशल फील करण्यासाठी सलमानने खूप प्रयत्न केले. न्यूयॉर्कमधील पत्रकार परिषदेतही अभिनेत्री कैफजवळ जात त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मागील वर्षी “कॉफी विद करण’मध्ये भाईजानने केटरीनाच्या अभिनयाची प्रशंसा करत ती उत्कृष्ट अभिनेत्री असल्याचे सांगितले होते. दरम्यान, सलमान आणि केटरिना सध्या अली अब्बास जफर यांच्या “टायगर जिंदा हे’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)