जवाहरलाल नेहरू हे पंडित नव्हते; भाजप आमदाराचा दावा

नवी दिल्ली – वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. ज्ञानदेव आहुजा यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाच्या आधी लावण्यात येणाऱ्या पंडित या शब्दावरच आक्षेप घेतला आहे.

ज्ञानदेव आहुजा यांनी म्हंटले की, जवाहरलाल नेहरू कधी पंडित नव्हतेच. ते गोमांस खायचे आणि गोमांस खाणारा व्यक्ती कधी पंडित असू शकत नाही. एवढ्यावरच न थांबता ते पुढे म्हणाले, जवाहरलाल नेहरू यांच्या नावाआधी पंडित हा शब्द नव्हता. परंतु केवळ ब्राम्हणांची मते मिळवण्यासाठी त्यांच्या नावापुढे पंडित लावण्यात आले होते, असेही त्यांनी म्हंटले आहे.

-Ads-

दरम्यान, याआधीही ज्ञानदेव आहुजा यांनी कथित गोरक्षकांनी केलेल्या हत्या, जेएनयुवर वादग्रस्त विधाने केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)