जवानाच्या प्रसंगावधानाने वाचले एकाचे प्राण

कर्जत – तालुक्‍यातील वायसेवाडी येथे सेवानिवृत्त जवानाच्या प्रसंगावधानामुळे विजेच्या तारेला चिकटलेल्या एकाचे प्राण वाचले.
येथील समाज मंदिरात गावातील काही ग्रामस्थ बसले होते. त्यावेळी समोरच्या घराच्या व्हरांड्यात बाळू विठ्ठल पवळ यांचा एक हात विजेच्या तारेला चिकटलेला व त्यांच्या विचित्र हालचाली सुरू असल्याचे सेवानिवृत्त जवान छगन सुळ यांच्या लक्षात आले. काहीतरी गडबड असल्याचे ओळखत त्यांनी तिकडे धाव घेतली. त्याचदरम्यान पवळ यांच्या पत्नीने त्यांच्या शरीराला हात लावून पाहिला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. तोपर्यंत सुळ तेथे पोहोचले.धावपळ पाहून आणखी काही लोक तेथे जमले. उपस्थित लोकांच्या मदतीने विजेचा पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला. त्यानंतर तारेला चिकटलेल्या पवळ यांची सुटका झाली. ते बेशुद्ध पडले. काही वेळातच सुळ यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर त्यांना राशीन येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सेवानिवृत्त असलेले जवान छगन सुळ यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पवळ यांचा प्राण वाचला. त्याबद्दल त्यांचे गावात कौतुक केले जात आहे.

सीमा सुरक्षा दलामध्ये सात वर्ष मेडिकल काम केले. त्या अनुभवांचा या प्रसंगात फायदा झाला. एका गावकऱ्याचा जीव वाचू शकलो याचे समाधान वाटते.
– छगन सुळ, सेवानिवृत्त जवान.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)