जवानांच्या व्हिडिओनंतर पंतप्रधान कार्यालयाने मागितला अहवाल

नवी दिल्ली : बीएसएफ जवान तेज बहादुरने व्हीडिओ शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यावरुन देशभरात चर्चा रंगू लागली. वरिष्ठ अधिकारी जवानांना चांगल्या दर्जाचं जेवन देत नसल्याचा आरोप जवानाने केला होता. या प्रकरणात आता पंतप्रधान कार्यालयाने लक्ष घातले असून या प्रकरणाचा संपूर्ण कार्यालयाकडून मागवण्यात आला आहे.
बीएसएफ जवान तेज बहादुर यादवने फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. बीएसएफच्या मोठ्या अधिकाऱ्यांवर त्यांनी आरोप केले होते. सरकारद्वारे जवानांसाठी दिले जाणारे राशन आणि इतर वस्तू काही मोठे अधिकारी कमी किंमतीत विकतात, असा गंभीर आरोप यादव यांनी केला होता. दरम्यान, त्यांच्यानंतर सीआरपीएफच्या एका जवानानेदेखील एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या व्यथा मांडल्या. दरम्यान, या दोन्ही व्हिडीओनंतर या प्रकरणात पंतप्रधान कार्यालयाकडून लक्ष घालण्यात आले असून याविषयीचा संपूर्ण अहवाल मागणवण्यात आला. दरम्यान, गृह मंत्रालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच या बैठकीत जेवनाच्या दर्जावर लक्ष देण्याचे सांगण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत गृह सचिव, NSA अजित डोभाल, IB चीफ, रॉ चीफ सह गृह मंत्रालयाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)