जवळ्यात शिवाजी महाराज जयंती साजरी

नान्नज – जामखेड तालुक्‍यातील जवळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुर्गअभ्यासक संदीप कदम यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. मुलींनी म्हटलेल्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जवळा गावातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. मुलींचे झांजपथक, टिपरी, लेझीम, हलगी पथक मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश आजबे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता वारे, नगरसेवक पवन राळेभात, प्रदीप पाटील, पंडित पवार, ज्योतिक्रांती मल्टिस्टेटचे संस्थापक अजिनाथ हजारे, प्रशांत शिंदे, रणजित पाटील, प्रदीप दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले यावेळी उपस्थित होते. अशोक पठाडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन सावता हजारे यांनी केले. प्रशांत आयकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)