जवळेत पाच एकर ऊस खाक

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील जवळे येथे शॉर्टसर्किटमुळे दोन शेतकऱ्यांचा 5 एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि. दि. 9) दुपारी घडली. जवळे येथील शेतकरी प्रवीण विजय खालकर आणि रंजीत सुर्यकांत कलापुरे यांच्या शेतातील ऊस तोडणी योग्य झाला होता.दरम्यान, मंगळवारी वीज वाहक तारां एकमेकांवर घासल्या शॉर्टसर्किट झाल. त्यात प्रवीण खालकर यांचा 3 एकर तर रंजीत कलापुरे यांचा 2 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. मंचर पोलीस ठाण्यात ऊस जळाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यामध्ये एकूण 5 एकर उसाचे 7 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सागर गायकवाड करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)