जवळार्जुन गावात पाण्याचा ताळेबंदविषयी कार्यशाळा

जवळार्जून – ग्रामगौरव प्रतिष्ठान, पाणी पंचायत खळद यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कुल जवळार्जुन येथे “गावाचा पाण्याचा ताळेबंद’ या विषयी मार्गदर्शन आणि जल जागृती अभियान प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गावाचा जलफलक तयार करण्यात आला, त्याद्वारे पाणलोट क्षेत्राची माहिती बागायत क्षेत्र, जिरायत क्षेत्र, पडीत क्षेत्र, गावठाण, रस्ते, जंगल क्षेत्र, गायरान यांचे क्षेत्र हेक्‍टरमध्ये सांगण्यात आली. तसेच गावातील उपलब्ध पाणी, एकूण क्षेत्रफळ, एकूण पाऊस, पावसाचे येणारे पाणी, पिकासाठी व बाष्पीभवनासाठी लागणारे पाणी, पाण लोटातून वाहून जाणारे पाणी, सिचंन व वापरासाठी उपलब्ध पाणी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पाणी पंचायत चे समन्वयक सचिन रायभान, विश्वास लवांडे, ग्रामसेवक लोणकर भाऊसाहेब, जनार्धन बापु टेकवडे, प्राचार्य निगडे, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)