जवळके येथे जिल्हा बॅंकेकडून एटीम सेवा सुरु

रांजणगाव देशमुख – जवळके (ता. कोपरगाव) येथे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सेवेसाठी जिल्हा बॅंकेने ए टी एम मशीन सुरु केले आहे. भविष्यात हे ए टी एम ग्राहकांना चांगली सेवा देईल अशी ग्वाही बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दि. अहमदनगर डिस्टिक्‍ट सेंटल को-ऑप बॅंकेच्या जवळके शाखेचे ए. टी. एम. सुविधेचे उद्घाटन जिल्हा बॅंक विकास अधिकारी कैलासराव गवळी यांचा हस्ते करण्यात आले. या सेवेमुळे ग्राहकांना बॅंकेतून पैसे काढण्यासाठी लागणारा मोठा वेळ वाचणार असून ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. जवळके परिसरात रांजणगाव देशमुख, अंजनापूर, बहाद्दरपूर, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, काकडी, मनेगाव आदी मोठी गावे असून या सर्वच गावांमध्ये एकही राष्ट्रीयकृत बॅंक नसून बॅंकेच्या कामासाठी नागरिकांना तालुक्‍याच्या गावाला जावे लागते त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसे दोन्ही खर्च होतात. परिसरात एक राष्ट्रीयकृत बॅंक सुरु व्हावी अशी म्हणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमधून होत आहे.
याप्रसंगी सरपंच बाबुराव थोरात, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे, बाजार समितीचे माजी उपसभापती नानासाहेब गव्हाणे, पोलीस पाटील सुधीर थोरात, माजी सरपंच बंडोपंत थोरात, लक्ष्मण थोरात, माजी सरपंच कैलास रहाणे, माजी उपसरपंच आण्णासाहेब भोसले, जवळके शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. जवळके शाखेचे अधिकारी आहेर व औताडे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)