पुणे जिल्हा: जळोची येथे कुख्यात गुंडाचा खून

बारामती एमआयडीसी परीसरातील घटना; किरकोळ कारणावरुन मारहाण

बारामती – बारामती एमआयडीसी परीसरात कुख्यात गुंड म्हणून वावरत आसलेला अक्षय जमदाडे उर्फ छोटा विमल याचा जळोची येथे खून करण्यात आला. जुन्या भांडणातील किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत छोटा विमल याचा खून करण्यात आला. शहारातील जळोची येथे गुरुवारी (दि.28) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनेतील नऊ आरोपींवर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना तात्काळ अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक सर्व आरोपी जळोची येथील आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बारामती शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अविनाश उर्फ पप्पू हौसेराव देवकाते, नाना उर्फ हौसेराव देवकाते, दत्तू गोफणे, सत्यवान उर्फ बगळ्या गेफणे, आबा ढाळे, दादा देवकाते, विकास उर्फ नाना मलगुंडे, योगेश गोफणे तसेच प्रविण गोफणे यांच्यासह इतर दोन ते तिन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश दत्तू गोफणे (वय 24) व विकास किसन मलगुंडे (वय 24 दोघे रा. जळोची) यांना आटक करण्यात आली आहे.
हौसेराव देवकाते यांचे हॉटेल आहे. तीन महीन्यापूर्वी हॉटेलवर जाऊन अक्षय उर्फ छोटा विमल याने खंडणी मागीतली होती. या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल झाली होती. फिर्यादीनुसार छोटा विमल यास पोलिसांनी अटक केली, त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आला होता. जुन्या भांडणाचा राग मनात धरीत त्याने देवकाते यांच्या घरावर दगडफेक केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या देवकाते कुटुंबीय व त्यांच्या नातेवाईकांनी अक्षय याला लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण केली. यामध्ये अक्षय याचा मृत्यू झाला, या घटनेनंतर धरपकड करीत पोलिसांनी काही आरोपी ताब्यात घेतले.

15 पेक्षा अधिक गुन्हे दाखल…
अल्पवयातच छोटा विमल हा सराईत गुन्हेगार बनला होता. वेगवेगळ्या पोलिसठाण्यात 15 पेक्षा अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. पुणे जिल्ह्यासह सोलापूर व सातारा जिल्ह्यातही छोटा विमल याच्या गुन्हेगारीचे जाळे पसरले होते. बारामतीसह इतर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील पोलिसांना त्याने जेरीस आणले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)