जळीतग्रस्त कुटुंबांना मिळणार प्रत्येकी 11 हजार रुपये

स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर

पुणे – पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांना आर्थिक मदतीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. पूर्ण घर जळालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 11 हजार रुपये आणि अंशतः घर जळालेल्या कुटुंबासाठी प्रत्येकी 5 हजार रुपये अशी एकूण 25 लाख 92 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 306 घरे बाधित झालेली आहेत. त्यापैकी 177 घरे पूर्णतः बाधित झाली असून त्या सर्वांना मिळून 19 लाख 47 हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तर, अंशतः बाधित घरे 129 इतकी आहेत. त्या सर्वांना मिळून 6 लाख 45 हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. महापालिका अर्थसंकल्पाच्या झोपडपट्ठीधारकांना आपत्कालिन सहाय्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील शिल्लक आर्थिक तरतुदीतून हे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत पाटील इस्टेटजवळ महात्मा गांधी वसाहत परिसरात 28 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाएकच्या दरम्यान भीषण आग लागली होती. या आगीत 306 घरे बाधीत झाली होती. दरम्यान, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील इस्टेट येथील जळीतग्रस्तांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे भांड्याचे किट वाटण्यात येणार असल्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले. हे पैसे लगेचच डीबीटीने संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचेही डॉ. धेंडे म्हणाले.

पुढील वर्षीसाठी अधिक तरतूद
यावर्षी आंबेडकर वसाहतीतील आगीची घटना, कालवा फुटी आणि पाटील इस्टेट झोपडपट्टी आग यामुळे आपत्कालिन घटनांसाठीची 50 लाख रुपयांची तरतूद संपली आहे. परंतु पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात आपत्कालिन मदतीसाठी जास्त रकमेची तरतूद केली जाईल, असे आश्‍वासन महापालिका आयुक्तांनी दिल्याचे डॉ. धेंडे यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)