जळीतग्रस्तांना पक्‍की घरे देणार

महापालिका-एसआरएची संयुक्त बैठक

पुणे – पाटील इस्टेट येथील आगीत घर जळून गेलेल्या कुटुंबियांना तात्पुरती मदत म्हणून पत्रे आणि वासे न देता, त्यांना थेट एसआरए योजनेतील पक्‍की घरे देण्याबाबत महापालिकेत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस एसआरचे अधिकारी उपस्थित होते.

-Ads-

पाटील इस्टेट येथे दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत 90 झोपड्या जळून खाक झाल्या असून या घरांमधील नागरीक बेघर झाले आहेत. त्यांच्या राहण्याची सोय महापालिकेने परिसरातील शाळांमध्ये केली आहे. तसेच महापालिकेकडून त्यांना तातडीची मदतही दिली जाणार आहे. मात्र, ही मदत तात्पुरती होईल. तसेच महापालिका त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी राहण्यास पाठवित आहे. मात्र, त्यापेक्षा त्यांना एसआरएच्या मदतीने त्याच ठिकाणी अथवा आसपास पक्‍की घरे देण्यात आल्यास या कुटुंबांना मोठा हातभार मिळेल, अशी भूमिका घेत महापालिका आयुक्तांनी ही बैठक बोलविली होती. त्यात या कुटुंबांचे पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच या नागरिकांना महापालिकेकडे असलेल्या सदनिका अथवा एसआरएच्या शिल्लक घरांमध्ये तात्पुरत्या निवासाची सोय करून त्यांच्यासाठी पक्‍की घरे देण्याबाबत चर्चा केल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)