जळगाव येथील अपघातात चार तरुणांचा मृत्यू

जळगाव – नशिराबाद गावाजवळ मुंबई-नागपूर हायवेवर मध्यरात्रीच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
हा भीषण अपघात बुधवारी मध्यरात्री नशिराबाद येथे काझी पेट्रोलपंपाजवळ झाला.

जखमींमध्ये कारचालक प्रिन्स अग्रवाल याचाही समावेश आहे. मृतांमधील चारपैकी तीनजण जळगावमधील आहेत.या अपघातात दोन्ही कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तक्रार नोंदविली असून अधिक तपास करत आहेत.

अपघातात ठार झालेल्या चारही जणांचे वय 20 वर्षांच्या आसपास असून ते जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहिवाशी होते. दरम्यान, या अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)