जळगावला महिनाभरात डॉक्‍टर मिळणार…

जळगाव – मंत्रिपदावरुन पायऊतार झालेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे सरकारविरोधात बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालये व आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेबद्दल बोलताना खडसे यांनी आरोग्यव्यवस्थेचे वाभाडेच काढले.

आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांना पत्र लिहूनही डॉक्‍टरच मिळत नसतील तर सरकारी रुग्णालये, आरोग्य केंद्रांना समारंभपूर्वक टाळे ठोका, अशी संतप्त मागणी त्यांनी आज विधानसभेत केली. जळगावची समस्या आजची नसून ती पूर्वीपासून सुरु आहे. जळगावमध्ये डॉक्‍टर का टिकत नाहीत, हा संशोधनाचा विषय आहे.

मी 1 लाख 70 हजार रूपये पगारही द्यायला तयार आहे, पण तेथे डॉक्‍टर टिकत नाहीत, असे डॉ. दिपक सावंत यांनी सांगितले. जळगावमध्ये महिनाभरात डॉक्‍टर येतील, असे आपण प्रयत्न करेन अशी ग्वाही आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी विधानसभेत दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)