जळगावमधून वासुदेव सुर्यवंशी एटीएसच्या ताब्यात

जळगाव – जळगावमधील साकळी येथून राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली असून तरुणाच्या घराची पोलिसांनी झाडाझडतीही घेतली. यानंतर पोलिसांनी दाभोलकर हत्येप्रकरणी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

वासुदेव सूर्यवंशी सनातनचा साधक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वासुदेवच्या घराची तपासणी केल्यानंतर एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली. वासुदेवची ओळख ही सनातनचा कट्टर कार्यकर्ता अशीच होती. पथकाच्या अत्यंत जलद आणि गोपनीय हालचालीने परिसरात खळबळ उडाली आहे. कोणत्याही गोष्टीचा सुगावा लागू न देता एटीएसने ही कारवाई केली. सध्या साकळी गावातून, वासुदेवसह एटीएसचे पथक रवाना झाले असून, या कारवाई बद्दल बोलण्यास, अधिकाऱ्यांनी नकार दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावल तालुक्‍यातील साकळी या गावातील सूर्यवंशीचा गॅरेजचा व्यवसाय असल्याचे समजते. एटीएसने तब्बल अडीच तास सूर्यवंशीच्या घराची झाडाझडती घेतली. त्याच्या घरातून पोलिसांनी संशयास्पद साहित्य जप्त केल्याचे वृत्त आहे. सूर्यवंशी हा एका हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचे समजते. सूर्यवंशी हा मूळचा मुक्ताईनगरमधील कर्की या गावातील रहिवासी असून तो सध्या साकळीत मामाच्या घरात राहत होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)