जल संवर्धन ही सामुदायिक जबाबदारी – नरेंद्र मोदी

तीन वर्षात जल संवर्धनामुळे सुमारे 150 लाख हेक्‍टर जमिनीला फायदा
मुंबई – जल संवर्धन ही सामाजिक आणि सामुदायिक जबाबदारी असलीच पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. एप्रिल ते जुलै हे महिने पावसाचे पाणी साठवण्यासाठीचा सर्वात उत्तम काळ असून पूर्वतयारी केल्यास उत्तम पिके घेता येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

आकाशवाणीवरुन आज प्रसारित झालेल्या 43 व्या “मन की बात’ कार्यक्रमात ते बोलत होते. नरेंद्र मोदी म्हणाले, पाण्याचे जतन हा आपल्या पूर्वजांच्या आयुष्याचा महत्वाचा घटक होता आणि त्यांनी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जतन करण्यासाठी नवीन तंत्र शोधून काढली होती. तामिळनाडूतल्या काही देवळांचे उदाहरण देताना पंतप्रधान म्हणाले की, या देवळांमध्ये दगडावर कोरलेल्या चित्रांमध्ये सिंचन पद्धती, पाणी जतन करण्याच्या पद्धती आणि दुष्काळ व्यवस्थापन उत्तम रितीने दर्शवण्यात आले आहे. गुजरातमधील अदलाज, रानी की वाव आणि राजस्थानमधल्या चांद बावडी ही ठिकाणे आवडती पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असून या विहीरी आपल्या पूर्वजांनी साध्य केलेल्या पाणी जतन मोहिमेची जिवंत उदाहरणे आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या तीन वर्षात जल संवर्धन आणि जल व्यवस्थापनावर मनरेगा अर्थसंकल्पाबरोबरच सरासरी 32,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 2017-18 या वर्षात एकूण 64,000 कोटी रुपये निधीपैकी 55 टक्के रक्कम जल संवर्धनावर खर्च करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या तीन वर्षात जल संवर्धन आणि जल व्यवस्थापनाबाबत केलेल्या उपाययोजनांमुळे सुमारे 150 लाख हेक्‍टर जमिनीला फायदा झाला आहे.

केरळमध्ये मनरेगा अंतर्गत सुमारे 7,000 मजुरांनी 70 दिवस परिश्रम करुन कुट्टुमपेरुर नदीचे पुनरुज्जीवन केले असे पंतप्रधानांनी सांगितले. उत्तर प्रदेशातल्या फत्तेपूर इथल्या जिल्हा प्रशासनाने ससुर-खादेरी नदीचे पुनरुज्जीवन कसे केले हे ही पंतप्रधानांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियात नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांबाबत पंतप्रधान म्हणाले की, या स्पर्धांमध्ये भारताने अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताचे प्रतिनिधीत्व करणारे सर्व कुस्तीपटू कुठले ना कुठले पदक घेऊन मायदेशी परतले. ही स्पर्धा विशेष होती, कारण पदक विजेत्यांमध्ये महिला खेळाडूंची संख्या अधिक होती, असे पंतप्रधानांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)