जलसिंचन योजनांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा 

शेतकऱ्यांच्या सहकारी पाणी पुरवठा संस्थांना होणार फायदा

कोल्हापुर – राज्यातील शेतकऱ्यांना वाढीव वीजदराचा फटका बसू नये यासाठी उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना प्रति युनिट 1 रुपया 16 पैसे असा सवलतीचा वीजदर लागू करण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी दिल्यानंतर दोन दिवसातच आज राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने तातडीने शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पूर्वलक्षी प्रभावाने 1 नोव्हेंबर 2016 पासून मार्च 2020 पर्यंत हा वीजदर लागू राहणार आहे. या निर्णयाचा फायदा अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

नदीपासून 50 मीटर ते 200 मीटर उंचीपर्यंत 2 ते 5 टप्प्यात पाणी पोहोचविण्यासाठी अनेक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी संस्थांची स्थापना करून उपसा जलसिंचन योजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी 29 जानेवारी रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या उपसा सिंचन योजनांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयाचा शासन निर्णय त्वरीत काढून हा दर लागू करण्यासाठी त्यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार ऊर्जा विभागाने दोन दिवसात कार्यवाही करून आज यासंबंधीचा शासन निर्णय जारी करून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या दरामुळे महावितरणवर पडणाऱ्या आर्थिक भाराच्या प्रतिपूर्तीसाठी महावितरणला शासनाकडून 107 कोटी 73 लाख रूपये देण्यात येणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)