जलसंपदा विभागाच भोंगळ कारभार

डिकसळ- मदनवाडी (ता. इंदापूर) आणि सिद्धेश्‍वर निंबोडी (ता. बारामती) येथील शेतीसाठी वरदान ठरलेली खडकवासाला धरणाची वितरिका क्रमांक 36 च्या चौकशीसाठी पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांनी वारंवार आदेश देऊन ही त्यांच्या पत्राची दखल अधीक्षक अभियंतांच्या कार्यालयाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. विभागीय चौकशीसाठी प्रस्ताव देऊन ही 25 मे पासून त्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच खडकवासला वितरीका क्रमांक 36 चारीच्या 6 ते 10 कामाचे सखोल चौकशीचे आदेश देऊन ही त्यावरही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनवणे यांनी केला आहे.
वितरीका क्रं. 36 चारीच्या 6 ते 10 व 16 ते 19 वर केलेल्या बोगस व निकृष्ट कामाचे फेर अंदाजपत्रक तयार करणे असे आदेश देण्यात आले होते आणि त्यांच्यावर आदेशाचे पालन जलसंपदा विभाग करीत नाही. जलसंपदाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने 36 चारीवरती शासनाच्या कोट्यवधी रुपयांवर फक्‍त डल्ला मारला आहे. कोठेही काम न करता बोगस बिले दाखवली गेली. कोणताही अधिकारी काम सुरू असताना फिरकला नाही. बोगस अंदाजपत्रक बनवुन संगणकावर वितरिका क्रमांक 36 चारीचा फोटो सेक्‍शन केल्याचे दिसून येत असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास उच्चन्यायालयात याचिका दाखल

  • 36 चारिच्या निकृष्ट कामांची विभागीय स्तरावरुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
    – टी. एन. मुंडे, मुख्य अभियंता, जलसंपदा, पुणे
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)