“जलयुक्‍त शिवार’ ला लोकसहभागाचे बळ!

  • मिशन जल संधारण : स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

तळेगाव दाभाडे – शासनाचा निधी आणि लोकांचा सहभाग यांच्या सहभागातून ग्रामीण सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीने मावळात चांगली गती घेतली आहे. कॉर्पोरेट क्षेत्राने या कामी दाखवलेला उत्साह आणि दिलेला सहयोग निश्‍चितच वाखाणण्याजोगा आहे. जलयुक्‍त शिवार अभियानामार्फत राज्यभर “पाणी आडवा-पाणी जिरवा’ ही जल संधारणची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधी स्वयंसेवी संस्था, उद्योग, व्यावसायिकांकडून सढळ हाताने मिळत असल्याने शासनाच्या “पाणीदार’ योजनेला आणखी बळकटी मिळणार आहे.

राज्य शासनाच्या जलयुक्‍त शिवार अभियानावर खर्च करण्यावर मर्यादा आल्या. त्यानंतर पंचक्रोशीतील कंपनींचा “सीएसआर’ निधी नियोजनबद्ध निवडक क्षेत्रात खर्च व्हावा, त्यातून त्या क्षेत्रात परिणामकारक बदल साधता यावेत, असे राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. हा धागा पकडून तहसीलदार रणजीत देसाई यांनी निधी उभारण्याचे आवाहन कारखानदारांना केले. त्याला सर्वप्रथम प्रतिसाद रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटी यांनी देऊन मावळ तालुक्‍यातील आठ गावांतील शेत तळ्यातील गाळ काढून देण्याचे काम हाती घेतले.

-Ads-

लोकोपयोगी काम करण्यासाठी रोटरी सारखी संस्था शासनाच्या मदतीला धावून आल्याबद्दल प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी समाधान व्यक्‍त केले. तसेच या पुढे अशा कामांसाठी शासन आपल्या पाठीशी सदैव उभे असेल, याची ग्वाही दिली. आम्ही केलेल्या आवाहनाला सर्वप्रथम प्रतिसाद दिल्याबद्दल तहसीलदार रणजीत देसाई यांनी रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटीचे आभार मानले.

“रोटरी’ ला खाण उद्योजक संघटनेची मोलाची साथ
रोटरी क्‍लबच्या पदाधिकाऱ्यांनी जलयुक्‍त शिवार अभियानासाठी निधी उपलब्ध केला. या कामाची पाहणी करुन कामाचा शुभारंभ मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांच्या हस्ते केला. तहसीलदार रणजीत देसाई व रोटरीचे डिस्ट्रिक्‍ट गव्हर्नर अभय गाडगीळ यांनी मागील आठवड्यात कल्हाट, ता. मावळ येथे भेट दिली. या प्रकल्पाला रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटी व मावळ तालुका खाण उद्योजक संघटना यांची मोलाची साथ मिळाली आहे.

पावसाळ्यात शिवार “पाणीदार’
मावळ तालुका खाण उद्योजक संघटनेच्या सहकार्याने सुरू केले काम पावसाळ्यानंतर या भागाचे रुपडेच बदलेल, असा विश्‍वास रोटरी सिटीचे अध्यक्ष शशिकांत हळदे यांनी व्यक्‍त केला. गावाचे उन्हाळ्यातील पाण्याचे दुर्भिक्ष निश्‍चित दूर होईल, असे सरपंच सुनीता पवार यांनी म्हणाल्या.

व्यक्‍ती, संस्था, संघटनांची मांदियाळी
जलयुक्‍त शिवार अभियानात मावळ तालुका खाण उद्योजक संघटनेचे अध्यक्ष विलास काळोखे, तालुका कृषी अधिकारी विनायक किोंथंबिरे, नंदकुमार शेलार, रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर कौस्तुभ दामले, रोटरीचे फाउंडेशन डायरेक्‍टर पंकज शहा उपस्थित होते. तसेच मावळ तालुका खाण संघटनेचे उपाध्यक्ष सागर पवार, सचिव श्रीकांत वायकर, किरण काकडे, संदीप काळोखे, कल्हाटच्या सरपंच सुनीता पवार, आंबळेचे सरपंच मोहन घोलप, पोलीस पाटील सारिका थरकुडे, रवी पवार, बबन आगिवले, दिगंबर आगिवले, रोहिदास धनवे, भाऊ कल्हाटकर, विनायक कल्हाटकर, संतोष पवार, मनोज करवंदे, जावेद मुलानी व रोटरी सिटी क्‍लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या गावात झाली कामे
माळेगाव बुद्रुक, निगडे, आल्हाट, जांभवली, अहिरवडे, उदयवाडी, करंडोली, कडधे, मोरवे, येलघोल, चांदखेड, ओहळे, पाचाणे, आढले बुद्रुक.

खात्यांतर्गत कामे पूर्ण
वन विभाग, कृषी विभाग, लघु सिंचन (जल संधारण), छोटे पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग.

 

मावळ तालुक्‍यातील 14 गावांमध्ये जल संधारण कामांच्या आराखड्यांतर्गत 444 कामे निश्‍चित करण्यात आली. आज मितीस 442 कामे पूर्ण झाली, तर उर्वरित दोन कामे छोटे पाटबंधारे विभागाची अपूर्ण आहेत. या विभागाकडून साठवण बंधाऱ्याचे खोलीकरण करण्यात येत असून ते 15 मे पूर्वी होईल. सीएसआर फंडांतर्गत टाटा कंपनीने दोन लाखांचा निधी दिला. रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटी आणि मावळ तालुका खाण संघटनेच्या पुढाकारातून 14 पैकी सहा गावांमध्ये जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम केले जात आहे.
– विनायक कोथिंबीरे,
तालुका कृषी अधिकारी, मावळ.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)