जलयुक्‍त शिवार अभियान झाले गतिमान

6 हजार 407 कामे पूर्ण : 97 कोटी 40 लाखांची कामे सुरु
नगर – जलयुक्‍त शिवार अभियानात शिवार पाणीदार होण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर “जलयुक्‍त’ची कामे सुरू आहे. टंचाईमुक्‍त महाराष्ट्र व सर्वांसाठी पाणी या उद्देशाने राज्य सरकारकडून गतिमान करण्यात आलेल्या अभियानाच्या 2017-18 या तिसऱ्या वर्षात जिल्ह्यातील 241 गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील या गावांत 6 हजार 407 कामे पूर्ण झाली आहे. तर 97 कोटी 40 लाखांचे काम सुरू असून, “जलयुक्‍त’च्या कामाला वेग आला असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी दिली.
या अभियानांतर्गत विभागनिहाय जलयुक्‍तची कामे पुढीलप्रमाणे-कृषि विभाग 5544, लघुसिंचन जि. प. 274, मनरेगा 506, जलसंधारण 185, वनविभाग 1312, सामाजिक वनीकरण 15 कामांची संख्या आहे. जलयुक्‍त शिवार अभियान 2017-18 यंत्रणानिहाय प्रगती अहवालानुसार 8 हजार 17 कामांचा 199 कोटी 44 लाख रूपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला. जलसंधारणाच्या या कामांपैकी 7 हजार 877 कामांचे कार्यारंभ आदेश प्रदान करण्यात आले असून, 6 हजार 407 “जलयुक्‍त’चे कामे पूर्ण झाले आहे.
कृषी विभाग, जलसंधारण, वनविभाग आदी सात प्रमुख यंत्रणांच्या एकत्रित आराखड्यातील कामांची संख्या तब्बल 8 हजार 17 एवढी आहे. 169 कोटी 68 लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. 176 कोटी रुपये खर्चाच्या 8 हजार 15 कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली असून, 126 कोटी 74 लाख रुपयांच्या 7 हजार 877 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. निविदा पूर्ण झालेल्या कामांची संख्या 4 हजार 84 आहे. 2017-18 या तिसऱ्या वर्षात जिल्ह्यातील 241 गावात केल्या जाणाऱ्या कामांची निश्‍चिती स्थानिक गावकऱ्यांच्या सूचना व पाणलोट क्षेत्राचा विचार करून शास्त्रोक्त पध्दतीने करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडील नाला खोलीकरण बांबू लागवडीची 701 कामे ही लोकसहभागातून होणार असल्याने ती आराखड्यातून कमी करण्यात आलेली आहे.

“जलयुक्‍त’ची कमी वेळेत दर्जेदार कामे
जलयुक्‍त शिवार अभियानाने शिवार जलसमृद्ध झाला आहे. जलयुक्‍तची कामे कमी वेळेत दर्जेदार केली जात आहे. या अभियानाला जलयुक्‍तसाठी निवड झालेल्या गावांचा शिवार पाणीदार होण्यासाठी लोकांच्या सहभागामुळे एकजुटीने रान पेटलं आहे. जलयुक्‍त शिवार अभियान टंचाईवर मात करणारे सिद्ध झाले असल्याची माहिती जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उर्वरित कामेही पूर्ण करण्याचे निर्देश
जलयुक्‍त शिवार अभियानात 2017-18 यंत्रणानिहाय प्रगती अहवालानुसार 6 हजार 407 कामे पूर्ण झाले आहे. उर्वरित कामेही लवकरात-लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. आराखड्यानुसार 199 कोटी 44 लाख रूपये मंजूर आहे. शिवार पाणीदार होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)