जलयुक्‍तमुळे’ विहिरी तुडूंब, पाण्याच्या पातळीतही वाढ

करंजी – पाथर्डी तालुक्‍यातील बहुतांश भागात झालेल्या संततधार पावसाने शिराळ, चिचोंडी, मिरी, तिसगाव या भागात “जलयुक्‍त’च्या कामांमुळे बंधारे आणि विहिरी अक्षरश: तुडूंब भरल्याचे चित्र दिसत आहे.

राज्य शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्‍त अभियान योजनेचे परिणाम हळूहळू आता दिसू लागले असून, पाथर्डी तालुक्‍यामध्ये आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून शिराळ, चिचोंडी, मिरी, लोहसर, तिसगाव या भागामध्ये प्रामुख्याने कॉंक्रिट बंधारे, बांधबंदिस्ती, सलग समतलचर व बंधाऱ्यातील गाळ काढण्याची कामे जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात झाली. सध्या संततधार सुरू असलेल्या पावसाने येथील परिसरातील बंधारे, विहिरी तुडूंब भरले आहेत. त्यामुळे जमिनीतील पाणीपातळीत वाढ होणार आहे. तसेच, शेतात झालेल्या बांधबंदिस्तीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडवले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)