जलयुक्‍तच्या माध्यमातून आजही पाणीपातळी टिकून : नेवसे

मिरजगावमध्ये सद्‌गुरू उद्योग समूहाकडून पालकमंत्र्यांचा अभीष्टचिंतन सोहळा

कर्जत: पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदार संघातील मतदारांचे भाग्य उजळले. कर्तृत्वाने कॅबिनेट मंत्री होवून मतदारसंघातील कित्येक प्रश्‍न मार्गी लावले. भीषण दुष्काळ असतानाही जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे आजही पाणी पातळी टिकून आहे, या शब्दात सद्‌गुरू उद्योग समुहाचे संस्थापक उद्धव नेवसे यांनी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला. मिरजगाव येथे जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सद्‌गुरू उद्योग समुहाकडून अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.
नेवसे कुटुंबाने शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले असून, संस्थेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी युवासेनेचे नेते अमोल देशमाने, स्विकार नेवसे, कर्जत नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, युवराज शेळके, जिल्हा बॅंकेचे संचालक दत्ता पानसरे, उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गागंर्डे, उपसरपंच अमृत लिंगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपत बावडकर, राजमल भंडारी, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. पंढरीनाथ गोरे, शिवसेना शहर प्रमुख संजय शेलार, भाजपा शहराध्यक्ष कैलास बोराडे, डॉ. विलास कवळे, अभंग बोरूडे, बिभिषण सुर्यवंशी, सदाबापू शिंदे, अशोक काकडे, अशोक शिंदे, माणिक बोरूडे, गुलाब गवारे, बबन म्हस्के, विनीत गांधी, गणेश नलवडे, बाळासाहेब निंभोरे, सचिन गुगळे, शंकर धतुरे, डॉ. अशोक काळदाते, वनअधिकारी नसिबखान सिंघल, प्रशासकीय अधिकारी सुलेमान शेख, बाळासाहेब दळवी तसेच परिसरातील ग्रामस्थ विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)