जलयुक्‍तची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण कराः द्विवेदी

????????????????????????????????????

नगर – जलयुक्‍त शिवार अभियानातील सन 2016-17 मधील कामांचे जिओ टॅगिंग करण्याचे काम तात्काळ पूर्ण करा, सन 2017-18 मधील पूर्ण झालेल्या कामांची देयके तपासून आणि योग्य ती दक्षता घेऊन अदा करा आणि ज्या यंत्रणांने अद्यापही कामे सुरु केली नाही त्यांनी ती तात्काळ सुरु करावीत, अशा स्पष्ट जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात बुधवारी जलयुक्‍त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे तसेच गाळमुक्‍त धरण आणि गाळयुक्‍त शिवार अभियानाचा आढावा बैठक जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपमहावनसंरक्षक आदर्श रेड्डी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगनाथ भोर, उपजिल्हाधिकारी वामनराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, आदी उपस्थिती होती.
द्विवेदी यांनी मागील बैठकीत जलयुक्त शिवार अभियानाच्या सन 2016-17 मधील पूर्ण झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या होत्या. या यंत्रणांनी या कामात चांगली प्रगती दाखवल्याने त्यांनी या यंत्रणांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी तालुकानिहाय जलयुक्त शिवार अभियानातील विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला. कृषी, लघुसिंचन, जलसंधारण, जलसंपदा, वन विभाग आणि गटविकास अधिकारी यांनी त्यांच्याकडील कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी. येत्या 15 जूनपर्यंत सन 2017-18 या अभियानातील कामे पूर्ण केली पाहिजेत, असे त्यांनी बजावले.
पाऊस सुरु झाल्यानंतर कामे पूर्ण करण्यासाठी अडचणी येतील. त्यामुळे सर्व यंत्रणांनी यादृष्टीने खबरदारी घेऊन कार्यवाही करणे अपेक्षित आहे. याशिवाय, सन 2018-19 मध्ये निवडण्यात आलेल्या गावांमध्ये ज्या ठिकाणी कामे सुरु करणे शक्‍य आहे, तेथील कामे सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.याशिवाय, गाळमुक्‍त धरण व गाळयुक्‍त शिवार अभियानांतर्गत ऑनलाईन आलेले अर्ज तसेच ऑफलाईन सादर झालेले अर्ज तात्काळ कार्यवाही करुन निकाली काढण्याचे आदेश त्यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)