जलयुक्त शिवार अभियानाची कामे तातडीने पूर्ण करावीत

धुळे : जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या अभियानांतर्गत धुळे तालुक्यात 2017- 2018 मध्ये करावयाची कामे महिनाभरात पूर्ण करावीत, असे निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिले.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत धुळे तालुक्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. उपजिल्हाधिकारी प्रदीप भोये (रोहयो), प्रभारी उपविभागीय अधिकारी शुभांगी भारदे (धुळे) उपस्थित होते.

भामरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या माध्यमातून पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या अभियानामुळे महाराष्ट्राचे नाव देशात घेतले जात आहे. त्यामुळे या अभियानातील कामांना गती देत कृषी, लघुसिंचन (जलसंधारण), वनविभाग, जिल्हा परिषद, भूजल सर्वेक्षण, पंचायत समिती (नरेगा) यांनी एक जूनपूर्वी कामे पूर्ण करावीत. जेणेकरुन आगामी पावसाळ्यात पाणी साठविता येईल. या कामांचा अहवाल आपल्याला नियमितपणे द्यावा.असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)