जलयुक्त शिवाराच्या चौकशीची मागणी

अमरावती – जलयुक्त शिवार योजनेंतर्गत हजारो अंदाजपत्रके मंजूर झाली असली. परंतु, या कामांचे मूल्यमापन झालेले नाही. यामुळे या कामाची त्रयस्थ विशेष दल (एसआयटी)मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे खा. आनंदराव अडसूळ यांनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मार्गदर्शनात जलयुक्त शिवारचे काम राज्यभरात मोठया गाजावाजासह सुरु आहे. तीन वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातही बरीच कामे झाली आहेत; परंतु कामे झाल्यावर कोणतेही मूल्यमापन झालेले नाही. जिल्ह्यात पडणारा पाऊस, पावसाचे दिवस व त्यानुसार प्रति हेक्‍टर क्षेत्रावर ज्या प्रमाणात कामे होणे आवश्‍यक होते, त्यापेक्षा अधिक कामे जेसीबीसारख्या यांत्रिक पद्धतीने झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)