जलयुक्त शिवारमुळे जिल्हा स्वयंपूर्ण : सौरभ राव 

पुणे : जलयुक्त शिवारमुळे जिल्हा स्वयंपूर्ण असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले. शहराची लोकसंख्या 50 लाख तर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या1 कोटी 4 लाख आहे. पुणे जिल्हा हा देशातील महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. पुणे शहर वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात ग्रामीण, शहरी आणि निमशहरी असा भाग आहे. जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमुळे वेगाने विकास होत आहे. मागील चार वर्षात जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याच्या दृष्टीने जिल्हा स्वयंपूर्ण झाला आहे. सुमारे 400 गावे जलयुक्त झाली आहे. मागील दोन वर्षात लोकसहभागातून 100 कोटींची कामे करण्यात आली आहे.

सध्यस्थितीत 190 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. पाणी वाटपाबाबत शहरी आणि ग्रामीण असा वाद होतो. ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील प्रत्येक नागरिक हा पुणेकरच आहे. सर्वांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)